भुसावळ वकील संघातर्फे ‘ढाल तलवारी पलीकडचे शिवराय’ या विषयावर व्याख्यान

0

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भुसावळ वकील संघातर्फे शिवव्याख्याते सचिन देवरे (पाटील) पाचोरा यांचे ” ढाल तलवारी पलीकडचे शिवराय” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन १ मार्च सायंकाळी करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश .श्री. पदवाड होते. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जाधव , वर्ग तीन , दिवाणी न्यायाधीश आर. एस. पाजनकर , न्या. सी. एस. खंडारे ,न्या. डी. जी. डोमाळे ,न्या. श्रीमती के. एम. पत्रे , ,भुसावळ वकिल संघाचे अध्यक्ष तुषार पाटील उपस्थित होते.

व्याख्यानात बोलताना सचिन देवरे पाटील यांनी सांगितले की शिवजयंती केवळ नाचून न साजरी करता शिवजयंती ही वाचून साजरी करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.

अत्यंत रसाळ आणि ओघवती भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध असे अष्टपैलू गुणांचे वर्णन केले. या कार्यक्रमाच्या दरम्यान माजी अध्यक्ष अॅड. सी. एम.सपकाळे यांचा सत्कार करण्यात आला. भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष तुषार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भुसावळ वकील संघाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध स्वरूपाचे व्याख्याने आजपर्यंत या ठिकाणी आयोजित केले गेले आहे.

अँड. सी.एम.सपकाळे यांनी यांनी सुरू केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत असे प्रतिपादन केले. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अु.म. पदवाड यांनी अध्यक्षीय भाषणात वास्तविक जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असलेले विविध गुणांच्या आचरण करणे हे महत्त्वाचे आहे .भुसावळ वकील संघातर्फे आयोजित शिव व्याख्यानाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाविषयी कौतुक केले . या कार्यक्रमाला भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष अॅड. तुषार पाटील ,,उपाध्यक्ष अँड. धनराज मगर , आणि ज्येष्ठ वकील, सर्व वकिल, महिला वकिल मोठ्या संख्येने उपस्थित होते.यशस्वीतेसाठी सचिव अँड .रम्मु पटेल , सहसचिव ,.पुरुषोत्तम पाटील , कोषाध्यक्ष राजेश कोळी, विजय तायडे, दीपक पाटील,. विश्वंभर वाणी, . वैशाली साळवे यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन पुरुषोत्तम पाटील यांनी केले . वकिल संघाचे पदाधीकारी उपस्थीत होते

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.