RRR चित्रपटाचा क्रेज कायम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

एस.एस.राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित RRR चितपटाची क्रेज अजूनही कायम आहे. प्रेक्षकांकडून भारतातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून प्रेमाचा वर्षाव होत आहे आणि तो कायम आहे. ज्युनियर NTR (Jr. NTR) आणि राम चरण (Ram Charan) स्टारर चित्रपट ऑस्कर प्रमोशनसाठी (Oscar promotion) 1 मार्च रोजी यूएस मध्ये जगातील सर्वात मोठा स्क्रीनिंग म्हणून पुन्हा रिलीज झाला आहे. हा स्क्रिनिंग बंपर हाउसफुलसह पुन्हा एकदा इतिहास रचत आहे. ‘RRR’ साठी 1,600 हून अधिक तिकिटे विकली गेली आणि बरेच लोक भव्य स्क्रीनिंगसाठी लांब रांगेत उभे असलेले दिसले.

ऑस्कर 2023 पूर्वी, पुन्हा एकदा चाहत्यांनी थिएटरमध्ये ‘RRR’ ला गर्दी केली होती. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्विटरवर अमेरिकेतील थिएटरच्या काही झलक शेअर केल्या आहेत. काही मिनिटांतच हा शो हाऊसफुल्ल झाला आणि चाहते पुन्हा चित्रपट पाहण्यासाठी लांब रांगेत उभे राहिले. यावरून समजते कि अजूनही ह्या चित्रपटाची क्रेज कायम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.