मुंबई ;- मोदींना मनसेनेने पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला आहे. गेल्या पाच वर्षात राम मंदिर, कलम ३७० सारखे निर्णय घेतले गेले. पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर उभा राहिलं नसते . पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत त्यामुळे त्यांचं गुजरात प्रेम स्वाभाविक आहे. इतरही राज्यांकडे ते लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. आता पुढे त्यांची पावले कशी पडतात हे पाहणं गरजेचे असे प्रतिपादन राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले कि मी जो पाठिंबा दिलाय त्यासंदर्भात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. भाजप , शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आणि पुढे कसं जायचं हे एक दोन दिवसात ठरेल. आमच्या पदाधिकाऱ्यांना महायुतीत योग्य वागणूक देतील अशी अपेक्षा आहे. भाजपच्या लोकांनी आमच्या कोणत्या राजकारण्यांशी बोलायचं याची यादी येणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींना दिलेल्या पाठिंब्यावर चर्चा केली. महायुतीतील पक्षांनी आमच्या कोणत्या नेत्यांशी बोलायचं याची एक-दोन दिवसांत आमची यादी तयार होईल. कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी कामाला लागायला सांगितलं. तसंच मी भूमिका बदलली नाही तर धोरणावर टीका केलीय असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.