राहुल गांधींची 2 वर्षांच्या शिक्षेविरोधात याचिका ; १३ एप्रिलला होणार सुनावणी

0

सुरत , लोकशाही न्यूज नेटवर्क
काँग्रेस नेते राहुल गांधी सुरतला पोहोचलेत. त्यांच्यासोबत त्यांच्या भगिणी प्रियंकाही आहेत. सुरतला पोहोचल्यानंतर त्यांनी एका बसमधून थेट सुरत सत्र न्यायालय गाठले. तिथे त्यांनी मानहाणीच्या प्रकरणात सुनावण्यात आलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेविरोधात याचिका दाखल केली. या प्रकरणी आता येत्या 13 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. राहुल गांधी यांच्यातर्फे वकील किरीट पानवाला यांनी कोर्टात अपील केले आहे.

तत्पूर्वी, सकाळी साडे 10 च्या सुमारास सोनियांनी राहुल यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर तासाभराने राहुल आपल्या घरून सुरतला रवाना झाले. राहुल यांच्यासोबत प्रियंका गाधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह लीगल टीमही सुरतला पोहोचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.