गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई

0

जळगाव :- मेहरूण भागातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील उद्यानात बेकायदेशीररीत्या घरगुती गॅसचा काळाबाजार करून मालवाहू वाहनांमध्ये भरत असताना सलीम शाह अरमान (वय ३६, तांबापुरा) याच्यावर कारवाई केली आहे.

त्याच्याकडून १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.