“सय्यद यांचा पाकिस्तानशी संबंध”; भाऊसाहेब शिंदेंचा खळबळजनक आरोप

0

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. इतकच नव्हे तर दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असा गंभीर आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) यांनी केला आहे. दीपाली यांचे पाकिस्तान बँक खाते असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांच्या या संबंधांविषयी भाजपच्या दिग्गजांना माहिती आहे. मात्र आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरु आहे, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. अहमदनगर येथे आज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हा खुलासा केला.

‘कारवाई करा, अन्यथा तोडफोड करू’
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadwanis) यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नाही, असा मोठा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय. आज पत्रकार परिषद घेऊन दीपाली सय्यद यांच्या पाकिस्तान कनेक्शनचे थेट पुरावेच आम्ही दिले आहेत. त्यानंतरही कारवाई झाली नाही तर आगामी काळात गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही आणि राज्यातील भाजप कार्यालये तोडफोड करून जाळून टाकू, असा इशाराही भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.