चांद्रयान-3 चे यशस्वी ‘लँडिंग’ वैज्ञानिक समुदायाच्या कल्पकतेचे आणि कठोर परिश्रमाचे परिणाम – राहुल गांधी

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

चांद्रयान-3 चे यशस्वी ‘लँडिंग’ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) मोठी उपलब्धी असल्याचे वर्णन करताना, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले की, हे यश वैज्ञानिक समुदायाच्या प्रतिभा आणि कठोर परिश्रमाचे परिणाम आहे.

अवकाश क्षेत्रात नवा इतिहास रचत इस्रोने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर ‘विक्रम’ आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ ने सुसज्ज LM चे सॉफ्ट लँडिंग केले. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला.

राहुल गांधी यांनी X वर पोस्ट केले, “आजच्या या अतुलनीय कामगिरीसाठी टीम इस्रोचे अभिनंदन. चंद्रावर चांद्रयान-3 चे ‘सॉफ्ट लँडिंग’ हे आपल्या वैज्ञानिक समुदायाच्या अनेक दशकांच्या प्रचंड कल्पकतेचे आणि कठोर परिश्रमाचे परिणाम आहे.

ते म्हणाले, “1962 पासून, भारताचा अंतराळ कार्यक्रम नवीन उंची गाठत आहे आणि तरुण स्वप्न पाहणाऱ्यांच्या पिढ्यांना प्रेरणा देत आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.