उपचारादरम्यान बालसुधार गृहात गळफास घेतलेल्या त्या मुलीचा मृत्यू…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगाव शहरातील बालसुधार गृहात १२ ऑगस्ट रोजी बालसुधार गृहातील शौचालयात १४ वर्षीय बालिकेने गळफास घेतला होता. तेव्हापासून तिच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी त्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूनम सुरेश भिल (१४) रा. अमळनेर असे मयत बालिकेचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर येथील पूनम भिल ही मुलगी जळगाव येथील बालसुधार गृह जिल्हा परिविक्षा निरीक्षण गृहात होती. पूनम हिला घरी जायचे होते. परंतू तिचे वडील बाहेरगावी असल्याने तिला नेणे शक्य झाले नाही. मात्र घरी जाण्याच्या मागणीच्या दुसऱ्याच दिवशी तिने गळफास घेतला. तिच्यावर ११ दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी तिची प्राणज्योत मालविली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.