मोठी बातमी; जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सिनेजगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनानं मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 81 वर्षीय अभिनेत्रीने पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या अल्झायमर या आजाराने ग्रस्त होत्या.

२०२० मध्ये त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देवाने मीडियावर याबद्दलची माहिती दिली होती. ते गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रमेश देव यांचं निधन झालं होत. हृदयविकाराच्या झटक्यांनंतर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. सीमा देव यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजा परांजपे दिगदर्शित ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. ‘सुवासिनी’, ‘आनंद’, अशा अनेक चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.