भडगावात अवैध वाहतूकीवर महसूल विभागाची कारवाई…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तालुक्यासह शहरात अवैध गौण खनिज तसेच अवैध वाळू गायरान जमिनीवर अनधिकृत गौण उचलून नेणे यावर भडगाव महसूल विभागाने आठवडा भरात अवैध वाहतूक करणाऱ्य डंपर, जेसीबी व ट्रॅक्टर वर कारवाई करत वाहणे शासकिय विश्राम गृह येथे जमा करण्यात आले आहे.

या बाबत अधिक महिती अशी की, तालुक्यातील आमडदे येथे गायरान जमिनीवर अनेक दिवसापासून जेसीबी च्या सहाय्याने गौण खनिजाचे उत्खनन सुरू होते. याची महिती भडगाव महसूल विभागाच्या पथकाला मिळाली या बाबत आमडदे येथे उत्खनन करतांना एक जे. सी. बी व एक ट्रॅक्टर आढळले या दोन्हीही वाहणे पथकाने ताब्यात घेतली असून भडगाव येथे जमा करण्यात आले आहे.

या कारवाई वेळी पथक प्रमुख मंडळ अधिकारी विजय येवले, डी. आर पाटील, महेंद्र् पाटील, डहाके भाऊसाहेब, भरत ननवरे, तलाठी राहुल पवार, योगेश ब्राह्मणे, अविनाश जंजाळे, पाशा हलकारे, तात्याराव सपकाळ, नवनियुक्त तलाठी लोकेश महाजन, करण कुलकर्णी आदींचा समावेश होता.

तसेच तालुक्यातील गिरड व चाळीसगांव रस्त्यावरील कोठली फाटा येथे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पथकाने सायंकाळी वाहतूक करताना पकडले व भडगाव तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले.

या पथकात निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे, महेंद्र पाटील तलाठी आर. डी. पाटील, तलाठी राहुल पवार, तलाठी अविनाश जंजाळे, तलाठी व्ही. सी पाटील, तलाठी आशिष काकडे, मंडळ अधिकारी विजय येवले, डी आर पाटील, सुनील मांडोळे, योगेश ब्राह्मणे, व्ही सी पाटील. व्ही पी शिंदे, आदींचा पथकात सहभाग होता.

या अवैध गौण खनिज व अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येइल व अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर भडगाव महसूल विभागाची अशीच कारवाई सतत सूरू राहील अशी महिती भडगाव पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे साहेब यांनी दैनिक लोकशाहीशी बोलताना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.