बिग ब्रेकिंग; राहुल गांधींना कोर्टाकडून झटका…

0

 

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातच्या सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेविरोधातील अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोलारमध्ये एका रॅलीत ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नाव कॉमन का आहेत? सगळ्या चोराचे नाव मोदी का असतं? असं विधान केलं होतं. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. संपूर्ण मोदी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान या प्रकरणी 23 मार्च रोजी, सुरतच्या CJM न्यायालयाने राहुल गांधी यांनी 2019 मध्ये मोदी आडनावाबाबत केलेल्या टिप्पणीप्रकरणी कलम 504 अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, न्यायालयाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली होती. आता न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.