योजनांच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे – खा. उन्मेश पाटील

0

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शेती करत असताना सल्ले देणाऱ्यांची संख्या खूप आहे. मात्र कृती करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे. ज्यांनी निश्चय केला त्यांना शेतीमध्ये समृद्धीचा हमखास मार्ग सापडला असून शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांनी स्वतःबरोबर परिसराचा विकास साधला आहे. याकरिता शेतकरी उत्पादक कंपनीचे फेडरेशन करून त्यांना प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आज रेशीम धागा समृद्धीअंतर्गत पैठणी उद्योगाच्या माध्यमातून रणदिवे परिवाराने एक आगळावेगळा प्रयत्न उत्तर महाराष्ट्रात साकारला असून केंद्राच्या सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचा स्टँडिंग कमिटीचा सदस्य या नात्याने मतदारसंघात “सिल्क व मिल्कच्या” माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आत्मनिर्भरतेचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले आहे.

आज देवळी ता. चाळीसगाव येथे क्रांतिवीर रेशीम उत्पादन गट भूमीवर शेतकरी उत्पादक कंपनी देवळी ता. चाळीसगाव जि. जळगाव यांच्या वतीने ज्ञानेश्वरी हातमाग पैठणी साडी निर्मिती केंद्र परिसरात शेतकरी व उत्पादक कंपनी मेळावा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी खासदार उन्मेशदादा पाटील बोलत होते.कार्यक्रमाला नाशिकच्या सह्याद्री फार्म कंपनीचे अध्यक्ष विलासजी शिंदे ,महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त पणन संचालक सुनील पवार, रेशीम विभागाचे सहसंचालक दिलीप हाके, पोखरा स्मार्ट योजनेचे दुत विजय कोळेकर,नाबार्डचे जिल्हा समन्वयक श्रीकांत झांबरे, आत्माचे सेवानिवृत्त प्रकल्प संचालक अनिलजी भोकरे, पोखरा योजना अधिकारी संजय पवार, ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजीव निकम,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर जाधव, पंचायत समिती सभापती अजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील, उद्योजक योगेश अग्रवाल, सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी दिलीप बाविस्कर, काँग्रेसचे राज्य पदाधिकारी अशोक खलाणे, मनोज गोविंदवार, दिव्यांग बांधवांच्या आधारवड मीनाक्षीताई निकम, उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील, नगरसेविका संगीताताई गवळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातून पद्माकर पाटील यांनी पैठणी साडी निर्मिती केंद्राचा प्रवास विषद केला. गेल्या अनेक वर्षांपासून सात्तत्याने दोघी मुलांच्या साथीने आजवरचा अनुभव विषद करतांना ते भावनाविवश झाले होते. ते म्हणाले खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या माध्यमातून नाशिक येथे सह्याद्री फार्मची नवीन तरुण शेतकरी बंधू भगिनी यांना अभ्यास दौरा घडवून आणू असा संकल्प बोलून दाखवला.माधव रणदिवे व विवेक रणदिवे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी तुतीची लागवड करणाऱ्या महिला शेतकरी सीमाताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले की जिल्ह्यात सर्वप्रथम तुतीचे लागवडीसाठी आवाहन करत जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन केले.500 पेक्षा अधिक शेतकऱ्यानी मनरेगाच्या माध्यमातून तुतीची लागवड करीत मोठे उत्पन्न घेतले. तुती लागवड, कोष लागवड या माध्यमातून आज जळगाव जिल्ह्यातच पैठणी साकारली जात असल्याचा आनंद आहे. शासन प्रशासन यांचा समन्वय साधत विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. काही शेतकरी क्लस्टर योजना साकारण्यासाठी पुढे आले माञ दोन वर्षांनी क्लस्टर साकारला जात असताना शेतकऱ्यांची नाराजी मंत्री महोदयांच्या कानावर पोहोचवली त्यांनी तातडीने सुधारणा करत सहा महिन्यात क्लस्टर साकारला जाणे संदर्भात आदेशित केले. आज सूक्ष्म लघु उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून 80 टक्के अनुदानाची क्लस्टर योजना मार्गी लागली. शासकीय योजनांची जत्रा च्या माध्यमातून 400 कांदा चाळ 8000 गाय गोठे शेड व हजारो शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. आमदार असताना पोखरा योजनेत चाळीसगाव तालुक्याचा समावेश केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीचा मार्ग मोकळा केला. कापूस केळी कवितेचा खान्देश अधिक समृद्ध व्हावा यासाठी गिरणा परिक्रमेचे माध्यमातून गिरणा खोरे पायी फिरलो आज मोठ्या प्रमाणावर शेतकरी प्रत्यक्ष भेटून योजना बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे.आज सल्ले देणारा नको तर सल्ल्याप्रमाणे कृती करणारा तरुण शेतकऱ्यांची समाजासह देशाला गरज असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की सर्व शेतकरी बांधवांना घेऊन सह्याद्री फार्म ची निर्मिती केली पडद्याच्या मागे राहून काम सुरू ठेवले. जेव्हा काम राज्य देश नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले त्यावेळेस अनेकांना आश्चर्य झाले परंतु उत्पादित शेतमाल व त्यावर प्रक्रिया होऊन वस्तू तयार होऊन त्या शंभर रुपयात फक्त दहा रूपये शेतकऱ्यांना मिळतात तर 90 रूपये इतर घटकांना मिळतात ज्यांचा या उत्पादनाशी काही संबंध नसताना त्यांना 90 टक्के उत्पन्नाचा वाटा जातो ही मूल्यवर्धित साखळी शेतकऱ्यांना समजावून सांगितली. त्यातून आज कंपनीने जगात तिसरा क्रमांक मिळवला आहे. खासदार उन्मेशदादा पाटील तत्कालीन आमदार असताना आमच्या फार्मवर आले होते. त्यांनी शासकीय योजनांच्या जत्रेत मला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं शेतकऱ्यांच्या बाबत कळवळा असलेले, योजना समजावून त्या जनतेपर्यंत पोहोचवणारे तरुण तडफदार खासदार उन्मेशदादा पाटील यांचे सातत्याने मला मार्गदर्शन लाभले आहे. आज सह्याद्री फार्म च्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकलो आपण देखील पुढे या आम्ही केलेला संघर्ष समजावून घ्या व समृद्धीची खूणगाठ बांधा असे आवाहन केले.

याप्रसंगी पणन संचालक सुनीलजी पवार यांनी देखील मनोगत व्यक्त करीत रणदिवे पवारचे अभिनंदन केले ते म्हणाले खासदार उन्मेशदादा पाटील हे सातत्याने फोनवरून विविध योजना बाबत माहिती जाणून घेत असतात कमी शब्दात योजनेच्या माहिती जाणून घेणारा अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून खासदार उन्मेशदादा पाटील यांचा उल्लेख करावा लागेल. माधव रणदिवे परिवार यांच्या पाठीशी खासदार खंबीर उभे आहेत.मी देखील या पैठणी उद्योगाला पुणे पर्यंतच्या प्रवासात सहकार्य करणार असून रणदिवे परिवाराची धडपड वाखाणण्यासारखी आहे.असे ते म्हणाले. याप्रसंगी विजय कोळेकर, श्रीकांत झांबरे, दिलीप हाके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती अनिल भोकरे यांनी आपण नवनवीन संकल्पना समजावून त्यावर मेहनत करायची तयारी ठेवल्यास माधव रणदिवेंसारखे अनेक शेतकरी भविष्यात या परिसराच्या कायापालट करतील याचा मला विश्वास आहे आज या कार्यशाळेत आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगत उपस्थितांचे आभार मानले. महाएफपिओचे सागर धनाड यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करीत कार्यक्रमात रंगत आणली.

याप्रसंगी भाजपा प्रदेश प्रतिनिधी उद्धवराव महाजन,सर्पमित्र राजेश ठोंबरे, आम आदमी पार्टी जिल्हा समन्वयक तुषार निकम, युवा उद्योजक छगन पाटील,मधुमामा ब-हाटे, एल डी पाटील सर, रमेश अहिरराव, रोहिदास नाना पाटील, उद्योजक प्रशांत देशमुख, प्रगतिशील शेतकरी डॉ.हरीश दवे ,सुभाष पाटील, गोकुळ बाविस्कर, सुभाष पाटील पिलखोड, उपप्राचार्य सी सी वाणी सर, प्रा.एम एम पाटील, राजेंद्र रणदिवे, प्रवीण पाटील, अनिल पाटील, मामासाहेब पाटील पिंप्रीकर,सुरेश पाटील, जयेश पाटील, बाळासाहेब पाटील हिंगोणेकर, चांगदेव राठोड, सुनील राजपूत, आर के पाटील, नरेंद्र साळुंखे, गुणवंत देशमुख, नरेंद्रकाका जैन, रवींद्र शुक्ल, समकीत जैन, कृषि विभागाचे अविनाश चंदेले, आत्माचे ज्ञानेश्वर पवार ,शुभम चव्हाण, राकेश कोतकर, प्रा.किरण पाटील, रवीपाटील पातोंडा, सुबोध जैन , सुनिल रणदिवे, ग्रामसेवक भाऊसाहेब चौधरी, लेमन प्रोड्युसर कंपनी अध्यक्ष गिरीश ब-हाटे,चंद्रकांत पाटील,सुनिल पाटील ज्ञानेश्वर पाटील भुषण पाटील, दिपक पाटील, गोरख पारधी गोपीचंद पाटील रावसाहेब पाटील,शुभम चव्हाण रविंद्र पाटील दिपक पवार ,गणेश पवार, अमोल देवकर, विवेक बोरसे,युवराज पाटील, प्रविण रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकरी मिञ अनिल भोकरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा व सुनीता भोकरे यांचा सुनील पवार व नीलिमा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.