बोगस डॉक्टर संबंधीत माहिती 10 दिवसात विनामुल्य देण्याचे आदेश…

0

 

खामगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

येथील नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी डॉ. श्रुती लढ्ढा यांनी अपील अर्जदार यांना 10 दिवसात विनामुल्य माहिती द्यावी असा आदेश तालुका आरोग्य अधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांनी 12 एप्रिल 2023 रोजी दिला.

खामगांव येथे अनेक ठिकाणी धाड टाकून अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्या बाबत तपासणी केली होती व काहींवर कारवाई सुद्धा करण्यात आली, पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा तक्रार करण्यात आल्याची माहीती मिळाली होती. जन सामान्य माणसाच्या आरोग्याशी संबंधित अश्या गंभीर स्वरुपाचे गुन्ह्य बाबत ची कारवाई ची माहीती सामान्य जनते पासून लपवून ठेवण्यात आली. कोणावर कारवाई केली, कोण अवैधपणे वैद्यकीय व्यवसाय करीत होते, कोण त्याला सहकार्य करीत होते याची कोणतीही माहीती जनतेला देण्यात आली नाही. या प्रकरणात अनेक मोठे व्यक्ती सामील असल्याची चर्चा सुद्धा खामगांव मध्ये सुरु होती. परंतु नंतर काय झाले याची माहीती दडपून देण्यात आली.

जनतेपर्यंत सत्य पोहोचवण्याकरीता पत्रकारिता एक दिशा दर्शक / मार्गदर्शक म्हणून काम करते. म्हणून सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळून अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची नावे व संपूर्ण माहीती जनते समोर यावी म्हणून येथील पत्रकार गणेश रामेश्वर भेरडे यांनी माहीती अधिकार कायद्यात तज्ञ नामांकित असलेले अॅड. राहुल सोनी यांच्या मदतीने उपरोक्त जनमाहिती अधिकारी यांच्याकडे माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये तालुक्यातील बोगस डॉक्टरांशी संबंधीत माहिती 24 नोव्हेंबर 2022 रोजी अर्जान्वये मागितली होती. परंतु जनमाहिती अधिकारी डॉ. श्रृती लढ्ढा यांनी अर्धवट माहिती देवुन अर्जातील संपुर्ण मुद्याविषयी समाधानकारक माहिती  दिली नसल्याने गणेश भेरडे यांनी प्रथम अपिलीय अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांच्याकडे 1 एप्रिल 2023 रोजी प्रथम अपिल दाखल केले होते. या अपिलावर 12 एप्रिल 2023 रोजी सुनावणी झाली. यावेळी पत्रकार गणेश भेरडे यांच्या वतीने अॅड. राहुल सोनी यांनी युक्तिवाद केला. पत्रकार गणेश भेरडे यांनी बोगस डॉक्टर संदर्भात मागितलेली माहिती लोकहिताशी निगडीत आहे. वैद्यकीय शैक्षणिक अर्हता नसतांना अवैधपणे दवाखाना चालविणे व रुग्णांवर उपचार करुन त्यांचे जीव धोक्यात टाकणे हा गंभीर प्रकार कोणताही वैयक्तिक वाद. तर हा मुद्दा पूर्णपणे सार्वजनिक व लोकहिताशी संबंधीत आहे. माहीती अधिकार अधिनियम अंतर्गत लोक हिताशी संबंधित माहीती उघड करण्यास कोणतीही मनाई केलेली नसल्याने ती माहीती देणे बंधनकारक आहे. तसेच बोगस डॉक्टर संदर्भातील माहिती सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आणुन देण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी यांची आहे. असे असतांनाही बोगस डॉक्टर संदर्भातील गंभीर माहिती आम जनतेपासून लपवून ठेवून अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सहकार्य करण्यासारखा प्रकार आहे. असा युक्तीवाद अॅड. राहुल सोनी यांनी केला. अॅड. राहुल सोनी यांच्या युक्तीवाद ग्राह्य धरुन प्रथम अपिलीय अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांनी अपील मंजुर करून जनमाहिती अधिकारी डॉ. श्रृती लढ्ढा यांनी अपिलार्थी ला १० दिवसात माहीती उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. शेवटी विजय हा सत्याचा होत असतो. आणि त्यात मुद्दा हा सामान जनतेशी संबंधित असला तर जनतेचे आशीर्वादाचा पाठबळ सुद्धा असतो. शेवटी अपिलार्थी गणेश भेरडे यांनी त्यांचे वतीने ठामपणे बाजु मांडणारे माहीती अधिकार कायदा तज्ञ अॅड. राहुल सोनी यांचे सुद्धा आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.