चोरटयांनी केली दगडफेक; पोलिसांचा गोळीबार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुणे; मध्ये घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर चोरट्यांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार करण्याची घटना घडली. सातारा रोडवरील चाफळकर कॉलनीत पहाटे साडेचार वाजता घडला.

याबाबत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, सातारा रोडवरील सिटी प्राईड मागे चाफळकर कॉलनी आहे. या कॉलनीतील सानिया या अपार्टमेंटमध्ये चोरटे घरफोडी करण्यासाठी शिरले होते.

तिसर्‍या मजल्यावर आवाज झाल्याने सुरक्षा रक्षकाला जाग आली. त्याला चोरटे आल्याचा सुगावा लागल्याने त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. त्याबरोबर पोलीस काही मिनिटात तेथे दाखल झाले.

यावेळी चोरटे इमारतीच्या जिन्यावरुन खाली उतरत होते. त्यांनी आपल्याकडील चाकू पोलिसांच्या दिशेने फेकून मारला. तसेच तेथे असलेले दगडही पोलिसांना मारले व पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी हवेत गोळीबार केला.

ते पाहून चोरटे शेजारी असलेल्या ओढ्यातून पळून गेले. चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे

Leave A Reply

Your email address will not be published.