एकाच रात्रीत तीन दुकाने फोडली; ७ लाखांचा मुद्देमाल लंपास

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील तीन दुकाने एकाच रात्रीत चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह सुमारे ७ लाखाचा मुद्देमाल घेऊन पसार झाल्याची घटना मंगळवार २२ रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

भुसावळ शहरातील गुन्हे व गुन्हेगारी प्रमाण गेल्या वर्षापेक्षा यंदा कमी आहे. मात्र चोरी घरफोडी वाढल्या आहेत. नववर्षा प्रारंभी सिनेस्टाइल चोरी करून सलामी देणाऱ्या चोरांनी पुन्हा डोके वर काढले असून एक प्रकारे चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे.

गोपी शॉपिंग मॉल फोडले

रेल्वे स्टेशन परिसरातील गोपी शॉपिंग मॉल यांच्या दुकानाच्या टेरेसचे पाचव्या मजल्याचे शटर वाकवून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून मॉलच्या प्रत्येक मजल्यावरील सामान अस्थव्यस्त केला. यावेळी महागडे कपडे तसेच ब्लेझर व १ लाख ५८ हजार रुपये रोख अशी एकूण रक्कम ४ लाख ५० हजार रुपये चोरटे घेऊन पसार झाले आहे. रात्रीच्या दरम्यान गोपी शॉपिंग मॉलचे मालक रविकुमार गोपीचंद झामनानी मॉल बंद करतांना सी.सी.टीव्ही कॅमेरे सुरू करण्याचे विसरल्याने नेमके चोरटे कोण हे समजू शकले नाही.

दुसरी घटना गोपी शॉपिंग मॉलला लागून असलेले गुरुनानक क्लाथ स्टोअर्समध्ये चोरट्यांनी गोपी शॉपिंग मॉलच्या पाचव्या मजल्यावरून गुरुनानक क्लाथ स्टोअर्सच्या तिसऱ्या मजल्याला साडीचा दोर बनवून उतरले. तसेच गोपी शॉपिंग मॉलमधील साड्यांच्या गठाणी बांधलेल्या गुरुनानक क्लाथ स्टोअर्सच्या मजल्यावर फेकण्यात आलेल्या आहेत. चोरट्यांनी गुरुनानक क्लाथ स्टोअर्समधील चार काउंटर उघडून सामान अस्थव्यस्त केला आहे. तसेच १ लाख ७५ हजार रोख रक्कम लांबविली आहे. या दुकानातील मालक वासुदेव मोटूमल मानवाणी हे सुद्धा सी.सी.टीव्ही कॅमेरे सुरू करण्याचे विसरल्याने नेमके चोरटे कोण हे समजू शकले नाही.

तिसरी घटना गुरुनानक क्लाथ स्टोअर्सला लागून असलेले हरे कृष्ण मॉलमध्ये घडली. चोरट्यांनी चौथ्या मजल्यावरील टेरेसवरील पत्रे वाकवून खाली उतरण्यासाठी ब्लॅकेटचा वापर चोरट्यांनी करून आत प्रवेश केला. तसेच ४२ हजार रोकड ब्लॅकेट व जॅकेट असे मुद्देमाल घेऊन पसार झाल्याची माहिती मालक केशव मोहनलाल गेलानी यांनी दिली. येथील सी सी कॅमेरे सुदैवाने सुरु असल्याने चोरीची घटना रात्रीच्या १२.५० वाजेच्या दरम्यान घडल्याचे सी. सी. टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.