धक्कादायक: समलैंगिक संबंधातून तरुणाचा खून

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.  समलैंगिक संबंधातून झालेल्या वादात एका महाविद्यालयीन तरूणावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची घटना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सदर तरूण बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता.

लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगंडे यांच्या माहितीनुसार, बकोरी रोड वाघोलीत २१ वर्षीय महाविद्यालयीन तरूणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. त्यानंतर तातडीने जखमी तरूणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

तरुण वाढे बोल्हाईत एका वसतीगृहात राहत होता. हल्लेखोराने त्याच्यावर कोयत्याने वार केल्यानंतर त्याने रूग्णालयात घेऊन जाणाऱ्या मित्राला आरोपीचे नाव सांगितले होते. हल्ल्याची घटना प्रेम प्रकरणातून झाल्याचे कळवले होते. त्यानंतर तरूण बेशुद्ध झाला होता. तपासा दरम्यान तरूणाची हत्या ही समलैंगिक संबंधातून झाल्याचा दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान नेमक्या कारणाचा पोलीस अजूनही शोध घेत आहेत. जखमी इसमाने सोबतच्या साक्षीदारास दिलेल्या वर्णनावरून आरोपीचे पूर्ण सविस्तर वर्णन मिळवण्यात आले आहे. त्यांच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.