‘जेवण चांगलं बनवले नाही’ म्हणून पोटाच्या मुलाने घेतला आईचा जीव

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आईशी क्षुल्लक कारणावरून भांडण करत तिचा मुलगा तिच्या जीवावरच उठल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यात हा प्रकार घडला असून, पोटच्या मुलाने आईचाच जीव घेतला. जीव घेण्याचं कारण काय, तर आईने चविष्ट जेवण दिलं नाही म्हणून. आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुरबाड तालुक्यातील वेळू गावात घडल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. यामुळे संपूर्ण गावात खळबळ माजली आहे.

रविवारी संध्याकाळी मुलाने आईशी भांडण केले आणि रंगाच्या भरात तिचा जीव घेतला. या दुर्दैवी घटनेत ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे आईवर हल्ला करून तिला संपवल्यावर आरोपी मुलाने झोपेच्या गोळ्यांचे अत्याधिक प्रमाणात सेवन केल्याचेही समोर आले. नातेवाईकांनी कसेबसे त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि तिच्या मुलामध्ये अनेकदा घरगुती कारणावरून भांडण होत होते.रविवारी सुद्धा त्यांच्यात असाच वाद झाला. घरात ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली. तर महिला रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडली होती. आईवरील हल्ल्यानंतर आरोपी मुलाने भरमसाठ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. शेजारी आणि नातेवाईकांनी कसेबसे त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले. आणि हल्ल्याबाबत पोलिसांना कळवले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही
आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. असे पोलिसांनी सांगितले. पण सोमवारी त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.