मोदींच्या विरोधात प्रियांका गांधी ? लवकरच राजकारणात सक्रीय एंट्री ? – सूत्र

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

लोकसभेच्या 2024 निवडणूका या अवघ्या एक वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी करण्यात लागल्याचे चित्र आहे. त्यातच काँग्रेसही आपली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी चांगलीच तयारी करत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र या निवडणुकीत एक वेगळेपण असल्याच म्हटलं जात आहे, यामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणूकांसाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यादेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या तेलंगणामधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगल्या आहे.

काँग्रेस आगामी लोकसेभेच्या निवडणूकीत प्रियांका गांधी वाड्रा यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मेडक किंवा महबूबनगर या ठिकाणी प्रियांका यांच्या उमेदवारीचा विचार होऊ शकते. न्यु इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती समोर आली आहे.

इंदिरा गांधींचा वारसा

1980 मध्ये इंदिरा गांधींनी मेडकमधून निवडून येत सत्तेत पुनरागमन केले होते. त्यामुळे जर काँग्रेसने प्रियांका गांधींच्या नावावर निवडणुकीत उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब केले तर त्या तेलंगणातील निवडणूकांपासून आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात करतील. तेलंगणा हे राज्य गांधी परिवारासाठी नवीन नाही. आणीबाणीच्या काळानंतर 1977 मध्ये लागलेल्या निवडणूकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. स्वत: इंदिरा गांधी या उमेदवार म्हणून पराभूत झाल्या होत्या. 1980 निवडणूक इंदिरा गांधींसाठी सोपी नव्हती. मात्र त्यांनी 1980 मध्ये इंदिरा गांधींनी मेडकमधून निवडून येत पुन्हा सत्ता स्थापन केली. म्हणूनच प्रियांका गांधींना मेडक मधून उमेदवारी देण्याची तयारी काँग्रेसच्या गोटात आहे. ज्याप्रमाणे इंदिरा गांधींना लोकांनी स्विकारलं होतं तसेच लोकं प्रियांका गांधींना देखील स्विकारतील असा विश्वास पक्षाला असल्याचे म्हंटले जात आहे.

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणात या वर्षाखेरिस विधानसभेच्या निवडणूका होणार असून यावेळी जर प्रियांका गांधींच्या राजकारणातील प्रवेशाची घोषणा केली तर, त्याचा सरळ परिणाम मतदारांवर होऊ शकतो. तसेच विधानसभेतील सकारात्मक प्रतिसाद हा लोकसभेत चांगले परिणाम देण्याची शक्यता देखील यावेळी वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.