Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»‘उद्या मी फी आणायला विसरणार नाही ‘ असे ३० वेळा लिहिण्याची विद्यार्थ्यांना शिक्षा करणारी शिक्षिका निलंबित
    ताज्या बातम्या

    ‘उद्या मी फी आणायला विसरणार नाही ‘ असे ३० वेळा लिहिण्याची विद्यार्थ्यांना शिक्षा करणारी शिक्षिका निलंबित

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 6, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    ठाणे , लोकशाही न्यूज नेटवर्क

    फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना ‘उद्या मी फी आणायला विसरणार नाही ‘ असे ३० वेळा लिहून आणण्याची शिक्षा करणाऱ्या घोडबंदर रोड येथील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलच्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.

    फी आणायला विसरलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षा केल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्याची चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांनी दिले होते. त्याप्रमाणे, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी शाळेला भेट देवून चौकशी केली. शिक्षण हक्क कायद्याने विद्यार्थ्यांना मानसिक अथवा शारीरिक इजा प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यानुसार, शिक्षिकेची चौकशी व्हावी असे स्पष्ट करण्यात आले.

    इयत्ता सहावीच्या एका तुकडीच्या वर्गशिक्षिकेने अशी शिक्षा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, शाळा व्यवस्थापनाने पुढील चौकशी होईपर्यंत त्या शिक्षिकेस निलंबित केले असल्याची माहिती राक्षे यांनी दिली. अशाप्रकारच्या घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी शाळेला सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच, चौकशीचा पाठपुरावा शिक्षण विभाग करीत आहे.

    यासंदर्भात, महापालिका आयुक्त . अभिजीत बांगर यांनी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना जाच निर्माण करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शालेय विदयार्थ्यांना भावनिक किंवा शारीरिक छळाला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण करणे प्रतिबंधित आहे. या परिस्थितीचा मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होतो. तरी शाळांनी याचे भान राखणे गरजेचे आहे. असे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

    New Horizon Scholars School Thane
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif