Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळल्याने अधिकाऱ्यासह चालक पोलिसाचा मृत्यू
    ताज्या बातम्या

    पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळल्याने अधिकाऱ्यासह चालक पोलिसाचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 30, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तीन जण जखमी ; एरंडोल तालुक्यातील खडके शिवारातील घटना

    एरंडोल ;– पिलखोड येथून तपासकामी जळगावला परतत असताना रस्त्यामध्ये चिंचेचे झाड पोलिसांच्या वाहनावर पडल्यामुळे मोठा अपघात होऊन चालक पोलिसासह एपीआय अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खडके शिवारातील अंजनी धरणाजवळ घडली. यात तीन पोलीस जखमी झाले आहे. एरंडोल पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी मदत कार्य करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले . अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर ( वय ३६) व चालक अजय चौधरी (वय ४०) हे दोन्ही जागेवरच ठार झाले. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

    पिलखोड येथून जळगावकडे सरकारी वाहन टाटा सुमोमधून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक वाहन क्रमांक (एम एच १९ एम ७५१) ने येत होते. अंजनि धरणाजवळ अचानक चिंचेचे झाड गाडीवर पडल्यामुळे चालकासह अधिकारी ठार झाले. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले.अंजनी धरणालगत ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील हे घटनास्थळी पोहचले.

    #crime #erandol jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif