महाराष्ट्र चेंबरचे ऑनलाईन सेमिनार ठरतायेत महिला उद्योजकांसाठी प्रकाशज्योत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर ने राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबर अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात जोरदार पुढाकार घेतला आहे. हाच हेतू ठेऊन राज्यातील उद्योजक व इतर महिलांसाठी उद्योग जगतातील विविध प्रश्नांबरोबर नावीन्यपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन सेमिनारचे प्रत्येक महिन्यात आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर ही राज्याच्या व्यापार, उद्योग, व्यावसायिक व कृषिपूरक उद्योगाची शिखर संस्था म्हणून गेल्या 97 वर्षांपासून यशस्वीपणे कार्यरत आहे.सदर उपक्रम महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स महिला उद्योजकता समितीच्या अध्यक्षा तथा गव्हर्निंग कौन्सील मेंबर संगीता पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येतो.

आजपर्यंत स्टार्टअप व अर्थतज्ञ डॉ. युवराज परदेशी यांनी “बिजनेस & स्टार्टअप,” आयसीएआयच्या माजी चेअरपर्सन पुणे येथील सीए ऋता चितळे यांनी “फायन्शीयल एज्यूकेशन,” इंटरनॅशनल बिजनेसचे ट्रेनर मिहीर शाह यांनी “हाऊ टू बी अ सक्सेसफुल एक्स्पोर्टर” या विषयांवर मार्गदर्शन केले आहे. भारतात महिला स्वतंत्र एकट्याने उद्योग उभा करत असले तरी अजून खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी उद्योग जगतात पाऊले ठेवायला हवीत. परंतू, नवीन उद्योग स्थापन करताना येणाऱ्या विविध अडचणी व प्रश्नांना कसे सोडवावे हा या सेमिनारचा प्रमुख हेतू असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.