जुलै महिन्यात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ; मुख्यमंत्री निर्णय घेणार – देवेंद्र फडणवीस

0

मुंबई ;- पुढील महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणारअसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बोलताना आहे. यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

आज छत्रपती संभाजीनगर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र ठरल्याची माहिती आहे. बैठकीबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठीच काल दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. याशिवाय आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. जुलैमध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू.असेही ते यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.