पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे ‘गुरु पौर्णिमा‘ उत्साहात साजरी !

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आज पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव, येथे ‘गुरु पौर्णिमा‘ उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या समन्वयिका मेघना राजकोटिया यांनी केले. सूत्रसंचालन सौम्या लोखंडे व रादित्य मौर्य या विद्यार्थ्यांनी केले. या प्रसंगाचे औचीत्य साधून पोदार इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य गोकुळ महाजन यांच्या हस्ते श्री शारदा प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.

याप्रसंगी ई.५ वी तील आयुष पाटील याने उपस्थित विद्यार्थ्यांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देत गुरुब्रह्मा गुरुविर्ष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या ओळीतून गुरु महिमेचे वर्णन केले. अज्ञानाच्या अंध:कारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जो घेवून जातो त्या गुरुचे आपण सदैव ऋणी राहिले पाहिजे असा आग्रह त्याने आपल्या भाषणातून केला. तर इ.८वी तील तनिष्का राठोड या विद्यार्थिनीने कवितेतून गुरुजनांविषयीचा आदर व्यक्त केला.

पोदार इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. माता आणि पिता हे प्रथम गुरु तर विद्यादान देणारे शिक्षक यांचे स्थानही महत्वाचे आहे असे संबोधन केले. पालक तसेच गुरुजानांचा आदर केला पाहिजे. त्यांनी दाखविलेल्या आदर्श मार्गावर पुढे जात यशाचे अत्त्युच्च शिखर गाठता येईल अशी हमी दिली. विद्यार्थ्यांनी परीश्रमाने मिळवलेली ध्येयप्राप्ती हीच गुरुजानांसाठी खरी गुरुदक्षिणा असते असे मत मांडले. शिक्षकांनाही ज्ञानदानाच्या अमूल्य व पवित्र कार्यातून ज्ञानज्योत अविरत तेवत ठेवण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी शाळेचे उपप्राचार्य दिपक भावसार, पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका उमा वाघ, प्रशासकीय अधिकारी जितेंद्र कापडे, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. संस्कृती पाटील या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.