जळगाव:-– इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जळगाव शाखेने 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ डॉक्टरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.
डॉक्टर डे निमित्त आयएमए हॉलमध्ये आयोजित सोहळ्यास अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा, सचिव डॉ. तुषार बेंडाळे, डॉ. अनिल पाटील, डॉ.स्नेहल फेगडे, मावळते अध्यक्ष डॉ. दीपक आठवले, मावळते सचिव डॉ.जितेंद्र कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील जेष्ठ डॉ. पी. एन. पाटील, डॉ. शाम ठाकूर, डॉ. अरुणा पाटील, डॉ.सागर न्याती, डॉ.शशिकला जावळे, डॉ.प्रकाश कोचर, डॉ. सुभाष चौधरी आदी मान्यवरांना सोहळ्यात तर डॉ. अ.ना. जोशी, डॉ. शांताराम सोनवणे, डॉ.नरेंद्र दोशी, डॉ. रमेश चौधरी यांना घरी जाऊन जीवन गौरव पुरस्कार कुटुंबीयांसह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. डॉ.अरुणा पाटील, डॉ. शाम ठाकूर, डॉ. सुभाष चौधरी यांनी सत्कारास उत्तर म्हणून मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. पंकज शाह यांनी केले. समन्वयक म्हणून डॉ. किशोर पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास आयएमएचे आजी-माजी अध्यक्ष, सचिव, विद्यमान कार्यकारिणीचे पदाधिकारी व 100 पेक्षा जास्त सदस्य डॉक्टरांची कुटुंबीयांसह उपस्थिती होती.