पोलिसांच्या कारवाईत 1 बनावट गावठी पिस्टल,2 जिवंत काडतुसे जप्त !

0

 

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भुसावळ शहरातील राहुल नगर येथील वाल्मीक समाजाचे आखाड्या समोरील मोकळ्या पटांगणात एक इसम गावठी पिस्टल सोबत बाळगत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी, गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहिती संदर्भात सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पथक घटनास्थळी पोहचून सापळा रचून संबंधित आरोपीस ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या जवळ एक बनावट गावठी पिस्टल सह दोन जिवंत काडतुसे देखील पोलिसांनी जप्त केले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी पो.ना शशिकांत पांडुरंग तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. 22/09/2022 रोजी रात्री 11:50 वाजता भुसावळ शहरातील राहुल नगर येथील वाल्मीक समाजाचे आखाड्या समोरील मोकळ्या पटांगणात एक इसम गावठी पिस्टल सोबत बाळगत असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून, आकाश राजेश टाक (29) राहणार 72 खोली,वाल्मीक नगर भुसावळ. त्याच्या कब्जात विना पास परवाना गावठी बनावटीच 15000 रू. किंमतीचे एक पिस्टल व 1000 रू. किंमतीचे दोन जिवंत काडतुसे बाळगतांना मिळून आला. एकूण 16000 रुपयांचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून आरोपिच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 3/25 व म.पो.अधिनियम कलम ( 37) (3) चे उल्लंघन केले म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोहेकॉ विजय नेरकर, पोना.निलेश चौधरी, पोना.उमाकांत पाटील, पो.ना.तुषार पाटील, पोकॉ.प्रशांत परदेशी, पो. कॉ.योगेश माळी, पो.कॉ.सचिन चौधरी, पो. कॉ.प्रशांत सोनार, पोना.दिनेश कापडणे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.