पिलखोडचा गिरणा पुल तिरंगामय

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने (Swatantracha Amrut Mahotsav) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या आवाहनानुसार हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) अभियान अंतर्गत पिलखोड (Pilkhod) येथे गिरणाजल फाऊंडेशनच्या वतीने गिरणा पुलावरील (Girana River bridge) दोघी बाजूच्या खांबांना तीनशे तिरंगा झेंडे लावण्यात येऊन पूल सुशोभित करण्यात आला.

पुल तिरंगामय केल्याने ग्रामस्थ, वाहनचालक यांचे लक्ष वेधून घेतले. याकामी गिरणाजल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य करून परिश्रम घेतले. या अनोखा उपक्रमाचे पिलखोड व परिसरातील ग्रामस्थांनी कौतुक केले. या उपक्रमाचे भारत वर्ड रेकॉर्ड करण्याचा मानस आहे असे पदाधिकाऱ्यांनी लोकशाहीला सांगितले.

कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) , खासदार उन्मेश पाटील(MP Unmesh Patil) व आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan), रामेश्वर नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.