दुचाकीवरून पडल्याने वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

पिंपळगाव (हरेश्र्वर) येथे नवसाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी जळगावहून मुलासोबत मोटरसायकलने निघालेल्या ६४ वर्षीय वृद्ध महिला ही लोहारी गावानजीक चालत्या मोटरसायकल वरुन पडल्याने डोक्यास गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

प्रमोद दिनकर बडगुजर (रा. सुप्रीम काॅलनी, एमआयडीसी, जळगांव) हे दि. १५ ऑगस्ट रोजी पिंपळगाव (हरेश्र्वर) येथील आपल्या शालकाच्या मुलाचा नवस असल्याने या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आई सुशिलाबाई दिनकर बडगुजर (वय ६४) यांना मोटरसायकल (क्रं. एम. एच. १९ – डी. बी. ११८८) ने जळगाव येथुन निघाले. दरम्यान सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील लोहारी गावानजीक मोटरसायकल ही स्पिड ब्रेकरवर आदळली असता मागे बसलेल्या सुशिलाबाई बडगुजर ह्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने सुशिलाबाई यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सुशिलाबाई बडगुजर यांना तात्काळ रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी सुशिलाबाई बडगुजर यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रंमाकाने पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.