अनेकतेतून एकता हे तर भारताचे खास वैशिष्ट्य

0

प्रवचन सारांश 15/08/2022 

लौकिक व लोकोत्तर दृष्टीने आजचा 15 ऑगस्ट खूप महत्त्वाचा आहे. या धर्मसभेत देशाच्या स्वातंत्र्याचा काय संबंध? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. आपण भारतात जन्मलो व आपले धर्माचरण करू शकतो हे सौभाग्याचे आहे. आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात पारतंत्र्य होते, अन्याय होता, अत्याचार होते. भारतावर 300 वर्षे दुसऱ्यांनी राज्य केले; कारण भारतात एकता नव्हती. त्यामुळेच भारतावर परके अधिराज्य गाजवू शकले. नारंगी प्रमाणे एकता नसावी ती असावी टरबुजा सारखी ! अनेकतामध्ये एकता हे तर भारताचे वैशिष्ट्य आहे. आजच्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने विशेष प्रवचन डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयधुरंधर मुनी यांनी केले.

भारत स्वतंत्र असल्यामुळे आपण धर्मा आचरण करू शकतो. आज आपण खरोखर स्वतंत्र आहोत का ? याचे चिंतन करायला हवे. स्वातंत्र्यता ही स्वच्छंदता तर नव्हे ना ? यासंदर्भामध्ये ‘पतंग’ आणि ‘पतंगा’ यांचे उदाहरण त्यांनी दिले. पतंग आकाशात मुक्तपणे उंच उडते, परंतु त्याचे नियंत्रण एका दोरीने ठेवलेले असते. छोटासा जीव पतंगावर कुणाचेही नियंत्रण नसते; परंतु तो पतंगा दिव्याच्या ज्योतीमध्ये जळून जातो. ‘आत्मा’ जर नियंत्रित नसेल तर त्याची गता पतंगाप्रमाणे होते. आत्म्याला स्वतंत्र बनवण्याचे लक्ष आपण ठेवले पाहिजे. कर्मावर विजय प्राप्त झाल्याशिवाय खऱ्या आनंदाची प्राप्ती होणार नाही असा विचार आजच्या प्रवचनात व्यक्त करण्यात आला.

जळगाव येथील स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती भरावे पट्टदर आचार्य श्री पूज्य पार्श्वचंद्रजी मसा डॉ. पदमचंद्र मुनी आधी ठाणा सात यांच्या पवित्र सांगण्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. त्यात मेरी भावना या प्रवचन मालेत आजच्या भागात, ‘नही सतावू किसी जीव को, झूठ कभी नही कहा करू..’ या ओळीचे विश्लेषण डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयपुरंदर मुनी यांनी केले.

‘आत्मवत सर्व भूतेशु’ म्हणजे माझ्यासारखेच इतर जीव होय. जी वस्तू माझ्यासाठी मला प्रिय असते ती वस्तू इतरांना देखील प्रिय असते. जी वस्तू मला अप्रिय असते ती इतरांना देखील अप्रिय असते; परंतु आपण दुसऱ्यांना शिव्या का घालतो ? शिव्या, वाईट बोलणे ही गोष्ट अप्रियच आहे. जशी ती आपल्या स्वतःसाठी अप्रिय तशी ती दुसऱ्यांसाठी ही अप्रियच असा विचार प्रत्येकाने करायला हवा. जैन दर्शनमध्ये ‘अहिंसा’ विषयी सांगितले आहे. “परपीडा म्हणजे अधर्म आणि परोपकार म्हणजे धर्म..” त्यामुळे कोणत्याही जीवाला  सतावू नये, त्रास देऊ नये असा मोलाचा संदेश आजच्या प्रवचनात देण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वाध्याय भवन येथे प्रथमच राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. संघपती सेवादास दलूभाऊ जैन यांच्याहस्ते ध्वजारोहण करून उपस्थित सर्वांनी प्रिय राष्ट्रध्वजास वंदन करून राष्ट्रगीत म्हटले.

———□■□■ —————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

Leave A Reply

Your email address will not be published.