जळगावसह ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कायम आहे. हवामान खात्याकडून (IMD Weather Alert) जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार मुंबई (Mumbai), पुण्यासह (Pune) महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिलाय.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1559095472488267776?s=20&t=yAImiFrBAexY6HIeZNh3VQ

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार पुणे (Pune), जळगाव (Jalgaon) यांसह विदर्भात पावसाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यासह जळगावात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येतेय.

मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई उपनगरात पावसाची रिपरिप सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. मुंबई नवी मुंबईसह ठाण्यात पावसाची संततधार पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने गडचिरोलीला झोडपून काढलंय. मुसळधार पावसाने नद्या-नाले दुथडी भरुन वाहत असून तब्बल 20 मार्गांवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुरामुळे जवळपास दोनशे नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आलंय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.