‘हॅरी पॉटर’च्या लेखिकेला धमकी; ‘पुढचा नंबर तुमचा..’

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यानंतर आणखी एका लेखिकेला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.

रश्दी यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी ट्वीट केले होते. जे के रोलिंग (JK Rowling) यांनी सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करणारे ट्वीट केले होते. तसेच रश्दी लवकरच बरे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

57 वर्षीय लेखिका जेके रोलिंग यांनी धमकी देणाऱ्या या संदेशाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. जे के रोलिंग हॅरी पॉटर (Harry Potter) या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका आहेत. रश्दी यांच्यावरील हल्ल्यानंतर आता जे के रोलिंग यांना धमकीचा संदेश मिळाल्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.