PF Scam; सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांवर फसवणुकीचा गुन्हा…

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

महाराष्ट्रासह देशात नावाजलेले पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पुणे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती नवले यांच्या अनेक शैक्षणिक संस्था असून, कोंढव्यात त्यांची सिंहगड सिटी स्कूल नावाची संस्था आहे. दरम्यान,  या शाळेत नोकरी करत असलेल्या दीडशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून 2019 ते 22 पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करण्यात आले होते. या सर्व कर्मचाऱ्यांची तब्बल 74 लाख रुपये मारुती नवले यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली होती. परंतु, कपात केलेली रक्कम मारुती नवले यांनी भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून पीएफ घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणी राहुल एकनाथ कोकाटे (५१), रा. क्रिमसन क्रिस्ट सोसायटी, हडपसर यांनी फिर्याद दिली आहे. कोकाटे भविष्य निर्वाह निधी विभागात अधिकारी आहेत.

आरोपी मारुती निवृत्ती नवले हे सिंहगड सिटी स्कूलचे संस्थापक आहेत. या शाळेमधील साधारण ११६ कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ पर्यंतच्या मासिक पगारातून भविष्य निर्वाह निधीची कपात करण्यात आलेली आहे. ७४ लाख ६८ हजार ६३६ रुपयांची एकूण कपात करून घेतलेली होती. परंतु, यातील फक्त तीन लाख ७५ हजार ७७४ रुपयांचीच रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात आल्याचा आरोप आहे. उर्वरित ७० लाख ९२ हजार ८६२ रुपयांचा भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून कर्मचाऱ्यांचा विश्वासघात केल्याचा दावा आहे. या प्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरून कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.