९९ टक्के मोबाईल धारकांना माहित नसलेल्या LTEआणि VoLTE चा अर्थ काय ?; जाणून घ्या !

0

नवी दिल्ली ;-स्मार्टफोनमध्ये आपण ही गोष्ट अगदी दररोज पाहतो. मात्र या गोष्टीबद्दल आपण फारसं जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा आपण जाणून घेत नाही. ही गोष्ट तुम्हीही अनेकदा तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पाहिली असेल. ही गोष्टमध्ये मोबाईलची रेंज दर्शवली जाते त्याच्या बाजूला दिसणारी LTE किंवा VoLTE असे लिहिलेलं दिसतं. मात्र या दोन शब्दांचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे का? या दोघांमध्ये नेमका काय फरक असतो याचा कदाचित तुम्ही विचार केलाय का?

तुमच्या मोबाईल स्क्रीनवर अनेकदा LTE लिहिलेलं दिसतं. तर कधीतरी VoLTE अशी अक्षरं दिसतात. या दोघांमध्ये फरक आहे. दोन्हीच्या माध्यमातून तुम्ही इंटरनेटचा वापर करु शकता. मात्र या दोघांमध्ये एक असा फरक आहे ज्यामुळे मोबाईल वापरण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून जाते. तुमच्या मोबाईलच्या नेटवर्क इंडिकेटरजवळ LTE लिहिलेलं असतं तेव्हा फोन कॉल असल्यास मोबाईलचं इंटरनेट डिस्कनेक्ट होतं. म्हणजेच फोन आल्यावर इंटरनेट कनेक्शन जातं. LTE चा फुलफॉर्म Long Term Evolution असा आहे. या उलट VoLTE लिहिलेलं असल्यास फोन कॉल सुरु असतानाही इंटरनेट कनेक्शन कायम राहतं. म्हणजेच फोनवर बोलता बोलताही युझर्स इंटरनेटचा वापर करु शकतात. VoLTE चा फुलफॉर्म Voice over Long Term Evolution असा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.