दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आझादी का अमृत महोत्सव हा प्रत्येक भारतीयाने “हर घर तिरंगा” लावून मोठ्या जल्लोषात साजरा केला. आणि झेंड्याला घरावरून उतरवून तीक्याच सन्मानपूर्वक घरात ठेवण्याच्या अधिसुचान्ही सरकार कडून देण्यात आल्या होत्या.
मात्र एक संतापोजांक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात एक व्यक्ती चक्क देशाचा राष्ट्रीय ध्वज असलेल्या तिरंगा झेंड्याचा वापर गाडी साफ करण्यासाठी करत आहे. त्यानुषंगाने सदर घटनेच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत एका 52 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
https://twitter.com/hem_men1/status/1567460779200217088?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1567460779200217088%7Ctwgr%5E027f26b6160aebf14c5afec870ff9c2a39108a51%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fmarathi%2Fhellomaharashtra-epaper-helomah%2Fskutisaphkaranyasathitirangyachavaparpolisannighetaletabyat-newsid-n420795982%3Fs%3Dauu%3D0x2d0c54a64bc38803ss%3Dpd
याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा १९७१ च्या कलम २ अन्वये भजनपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्या व्यक्तीची गाडी आणि त्याचा झेंडाही जप्त करण्यात आला आहे.
सदर घटना ईशान्य दिल्लीतील भजनपुरा भागातील आहे. तसेच हा व्यक्ती उत्तर घोंडा भागातील रहिवासी असल्याचेही पोलिसांनी सांगितले. याबाबतचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा व्यक्ती तिरंग्याच्या साहाय्याने आपल्या गाडीला साफ करत आहे.