संस्कृती व साहित्य जपून ठेवा- पूज्य. डॉ. पदमचंद्र मुनी

0

प्रवचन सारांश 07.09.2022 

मुख्य प्रवचनामध्ये डॉ. पदमचंद्रजी म.सा. यांनी ‘जैन’ शब्दाची व्याख्या सांगितली. जैन म्हणजे प्रत्येक सजीवाला जोडून ठेवणारा असतो. पूज्य श्री. जयमलजी म.सा. आचार्यांनी तेच कार्य केले असून त्यांच्या जन्मोत्सवाच्यानिमित्त एक संकल्प केला पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे. आचार्यांनी सांगितेला मार्ग त्यांचे साहित्य जपले पाहिजे. ज्यांची संस्कृती व साहित्य पुढील पिढी संस्कारीत करते तेच इतिहास घडवित असतात आचार्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे म्हणजे जैन होय.

जैन हिल्सवरील पडीक जमिनीवर नंदनवन फुलविणारे ऋषभदेवतेचा संस्कारातून जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखविणाऱ्या भवरलाल जैन यांचे जीवन संघर्षमय होते. मात्र संघर्षातून जैनत्व सिद्ध करता येते आणि जैन समाजाचा गौरव वाढविता येतो हे त्यांच्या आचरणात दिसते ही शिकवण घेऊन आपल्या आयुष्यात आचरण करावे, स्वच्छता आणि स्वयंशिस्तीच्या आचरणात आनंदानुभूति मानावी हा संस्कार आचार्य जयमलजी म.सा. यांनी दिला असून त्या मार्गावर चालावे असेही यावेळी डॉ. पदमचंद्रजी म.सा. म्हणाले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

Leave A Reply

Your email address will not be published.