भडगाव पो.नि अशोक उतेकारांना दंड; शिस्तभंगाच्या कारवाईचे न्यायालयाचे आदेश…             

0

 

भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क:

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव (Bhadgaon) पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर (Police Inspector Ashok Utekar) यांच्या विरूद्ध बेकायदेशीर कृत्य व आरोपीशी सेटलमेंट. तसेच पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी अनेक गंभीर तक्रारी महाराष्टू राज्य मानवी हक्क न्यायालयात याचीका विविध तक्रारदारांनी दाखल केलेल्या आहेत.

त्यातील प्रथम खटला भानुदास महाजन (कजगाव) यांच्या पत्नीची फिर्याद दाखल करण्यास नकार दिल्याने सदर तक्रारदार यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांचे मे.न्यायालयात खटला  केस नंबर 4360/22 दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी कायद्याच्या उल्लंघन व अभिव्यक्ती स्वातंत्र्य पासून वंचीत ठेवून अवमान करणे, फिर्याद दाखल करण्यास नकार दिल्या प्रकरणी पदांचा दुरुपयोग/गैरवर्तन आयोगाच्या चौकशीत निष्पन्न झाले. भडगांव पोलिस निरीक्षक यांना 50 हजार रु. दंड व शिंस्त भंग कारवाई व सदर प्रतिस्पर्धी आरोपीं वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. व दंडाची ५० हजार रू रक्कम ही तक्रारदार यांना दोन महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.