भडगाव येथे मंगळवार रोजी खंडेराव महाराज यात्रा उत्सव.

0

 

भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क:

मध्यवर्ती शहर बाजार चौकात पुरातन खंडेराव महाराज मंदीर असुन खंडेराव महाराज काकणबर्डी येथे जाताना भडगाव मुक्कामी होते. असा इतिहास आहे. चंपाषष्टी निमित्ताने खंडेराव मंदीरात सालाबादाप्रमाणे खंडेराव महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

दरवर्षी खंडेराव महाराज यात्रा उत्सव निमित्ताने भरीत व भाकरी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुमारे चार ते पाच हजार भाविक भरीत भाकरीचा अस्वाद घेतात. सायंकाळी शहरातील पाच जोडप्याच्या हस्ते दिवटी पुजन करुन दिवटी मिरवणुक काढण्यात येते. तर रात्री 8 वाजता संतोष मोरे, आशाबाई सोनवणे (अमळनेरकर) यांचा गोंधळचा कार्यक्रम होणार आहे. यशस्वीतेसाठी यात्रा उत्सव पंच कमेटीचे सर्व पदाधिकारीसह कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.