मुक्ताईनगर येथे संविधान दिन चिरायू होवो घोषणांनी गरजला प्रवर्तन चौक…

0

 

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क:

26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात बौद्ध समाज बांधवांनी सकाळी नऊ वाजता भारतरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून वंदन केले. त्याचबरोबर सामूहिक बुद्ध वंदना घेऊन महापुरुषांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या. तसेच बी. डी. गवई यांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले.

26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे दोन दिवस आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला नंतर 26 जानेवारी 1950 रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, समता बंधुता स्वातंत्र्य व न्याय या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवली व भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाला संतोष बोदोडे, माजी सभापती मोहन मेढे, माजी पोलीस पाटील सुधाकर बोदोडे, आरपीआय अध्यक्ष आर के गणेश ससाणे, नगरसेवक सखाराम हिरोडे, कला मंच अध्यक्ष बी.डी.गवई, भिवाजी तायडे, आर.आर धुरंदर, शाहीर रवींद्र बोदडे, अनिल बोदोडे, उमेश झाल्टे, माणिक निकम, राजू बोदडे, जगदेव इंगळे, संतोष इंगळे, राहुल गणेश, संजीव पालवे, रमेश बोदडे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.