नवीन बसस्थानक परिसरातून महिलेची पर्स लंपास

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील नवीन बसस्थानक परिसरात महिलेची पर्ससह मोबाईल व २१ हजाराची रोकड असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि माहिती अशी की, स्वाती प्रमोद पाटील (वय-५५) रा.पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा ह.मु. गुलमोहर कॉलनी जळगाव या महिलाच आपल्या परिसरात परिवारासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता त्या जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथे आल्या. अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स लांबवली, त्या पर्समध्ये २१ हजार रुपयाची रोकड आणि ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोकॉ फिरोज तडवी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.