कंटेनर चालकाने बेधुंद होऊन वाहनांना दिली धडक; तरुण जागीच ठार

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या अपघाताचे प्रमाण हे जास्तच वाढले आहे. नाशिक (Nashik), मनमाड ते येवला महामार्गावर (Highway) बेधुंद होऊन एका कंटेनर चालकाने कंटेनर चालवत अनेक वाहनांना धडक दिली आहे. यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले असून, नागरिकही दुखापतग्रस्त झाले आहे. त्यामध्ये एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील विखरणी येथील तो तरुण आहे. ‘रोशन मच्छिंद्र वाघमोडे’ असं अपघातात (Accident) मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोशन हा आपल्या आईसह इतर महिलांना घेऊन बहिणीच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी जात असतांना हा अपघात घडला आहे.

कंटेनरने धडक दिल्यानंतर गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघात इतका भयंकर होता की यामध्ये रोशनचा जागेवरच मृत्यू झाला होता. दुर्दैवी बाब म्हणजे जन्म देणाऱ्या आईच्या डोळ्या देखतच रोशनने प्राण सोडले. कोपरगावच्या दिशेने येऊन मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान अनेक वाहनांना उडविले आहे. त्यामध्ये विंचुर चौफुलीवर चार ते पाच वाहनांना धडक दिली होती. नागरिकांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असतांना त्याने तिथून पळ काढला होता.

या अपघातात किती जखमी किंवा मृतांची संख्या किती आहे. नुकसान किती झाले आहे हे समोर आले नसले तरी एका तरुणाचा झालेला मृत्यू मनाला चटका लावून जात आहे. रोशन वाघमोडेच्या मृत्यूनंतर संपूर्ण गाव सुन्न झालं आहे.अवघ्या काही दिवसांवर बहिणीचा विवाह येवून ठेपल्याने खरेदीची लगबग सुरू होती. आपल्या आईसह महिलांना घेऊन रोशन वाघमोडे हा येवला येथे खरेदीसाठी गेला होता. त्याच दरम्यान अपघात घडला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.