धक्कादायक; पारोळ्यातील विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

परोळ्यातील रहिवासी असलेला विद्यार्थ्याचा अमळनेर येथे विहिरीत पोहताना मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुभम धोत्रे (१७) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

याबातीत सविस्तर वृत्त असे कि, पारोळा येथील सावित्री फायर वर्क्सचे व्यवस्थापक विनोद धोत्रे यांचा मुलगा शुभम विनोद धोत्रे (१७) हा अमळनेर येथे इ ११वीत शिकत होता. तो काल दि. १६ ऑगस्ट रोजी अमळनेर तालुक्यातील गलवाडे शिवारातील विहिरीत आपल्या मित्रांसह पोहायला गेला. त्याने विहिरीत उडी घेतली, मात्र तो परत आलाच नाही. म्हणून त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड सुरू केली. तेव्हा आजुबाजुच्या लोकांना सदर घटना समजली. यावेळी त्याला शोधण्याचे प्रयत्न केले परंतु विहिरीत गाळ असल्याने तो सापडला नाही. तेव्हा लोकांनी राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांना सदर घटना दुरध्वनी वरून कळविली, राज्य मंत्र्यांनी लागलीच जिल्हाधिकाऱ्यांना सुचना केली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी एस डि आर एफ शी संपर्क करून बचावकार्याचे आदेश दिले. बऱ्याच प्रयत्नानंतरही सदर युवक सापडत नव्हता. म्हणून पारोळा तालुक्यातील वडगाव येथील हिलाल श्रावण भिल या पट्टीच्या पोहणाऱ्याला पाचारण करण्यात आले. त्याच्या अथक परिश्रमाने सदर युवक मृत्य अवस्थेत आढळून आला. त्याला लागलीच अमळनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुभम हा विनोद धोत्रे यांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.