ऑनलाईन मुलाखतीच्या नावाने तरुणाला गंडवले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढतच आहे. ऑनलाईन मुलाखतीच्या नावाने तरूणाच्या बँक खात्यातून १७ हजार ६०० रूपये परस्पर काढून नेल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा येथील शिवाजी नगर येथील रहिवासी असलेला तरुण सोहन अशोक मोरे (वय २४) हा कुटुंबियांसह राहतो. २ मे रोजी दुपारी त्याला अनोळखी नंबरवरून फोन आला. नोकरीसाठी ऑनलाईन मुलाखत द्या असे सांगितले.

समोरील नंबरवरून महिलेने एक लिंक पाठविली. व पेपर सोडविण्यास सांगितले. तरूण पेपर सोडवित असतांना त्याच्या बँक खात्यातून एकुण १७ हजार ६०० रूपये परस्पर वर्ग करून फसवणूक केल्याचे समोर आले.

दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ निवृत्ती मोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.