गावठी पिस्तूलासह संशयित आरोपी जेरबंद

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

परिसरात गावठी पिस्तूल घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील पिस्तूल हस्तगत केली आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील निलेश उर्फ सुपड्या चंद्रकांत ठाकूर (वय २७, रा. मढी चौक पिंप्राळा) हा तरूण हातात गावठी पिस्तूल घेवून परिसरात दहशत पसरविण्यात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सपोनि जालिंदर पळे, पो.ना. प्रितमकुमार पाटील, विजय पाटील यांनी बुधवार ४ मे रोजी दुपारी कारवाई करत संशयित आरोपी निलेश उर्फ सुपड्याला अटक केली. दरम्यान त्यांच्या ताब्यातून २० हजार रूपये किंमतीची गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे.

याप्रकरणी पो.ना. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाहेकॉ सुशील चौधरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.