पोलिसांना धक्काबुक्की; सरपंचासह चौघांना पोलीस कोठडी

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

कुर्‍हे पानाचे येथील जुगार अड्डयावर धाड टाकणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की करणार्‍या कुर्‍हे पानाचे येथील सरपंचासह चौघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

मंगळवारी सायंकाळी कुर्‍हे पानाचे येथील जुगार अड्ड्यावर भुसावळ तालुका पोलिसांनी छापा टाकून १६ जुगारी पकडले होते. यावेळी सरपंच जीवन प्रल्हाद पाटील, प्रमोद रामा भोई, ईश्वर भागवत भोई व सुभाष भिका पाटील यांनी पोलिसांना मारहाण करून दोन संशयितांना पळवून लावले होते. सरपंच जीवन पाटील यांनी पोलिसांना धक्काबुक्की देखील केली होती.

याप्रकरणी चौघांना अटक झाली होती. या संशयितांना बुधवारी भुसावळ न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.