पाचोर्‍यातील रेणुका माता मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी दागिने व रोकड चोरली

0

पाचोरा;- शहरातील त्र्यंबक नगर परिसरात असणाऱ्या रेणुका माता मंदिरातून अज्ञात चोरटयांनी मूर्तीवरील 28 हजार रुपयांचे दागिने आणि मंदिरातील दानपेटीतील चाळीस हजार रुपये रोख असा एकूण 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार ३ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून या प्रकरणी पुजाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आणि विरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की त्रंबक नगर येथे रेणुका माता मंदिर असून पुजारी शांताराम सदाशिव जोशी वय 70 हे पूजा करण्यासाठी गेले असता त्यांना मूर्तीवरील सात ग्राम वजनाच्या सोन्याचे दागिने नथ व गळ्यातील पोत असा एकूण 28 हजार रुपये व दानपेटीतील अंदाजे चाळीस हजार रुपयांची रोकड असा एकूण 68 हजार रुपयांचा मुद्देपाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

Leave A Reply

Your email address will not be published.