कोळगाव येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले

0

भडगाव;- तालुक्यातील कोळगाव येथे श्री स्वामी समर्थ ज्वेलर्सचे दुकान अज्ञात चोरटयांनी फोडून दुकानातील ४० हजार रुपये किमतीचे एक किलो वजनाची मोडची चांदी चोरून नेल्याचा प्रकार 31 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला . याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की नितीन भरतराव डहाले रा. गुढे तालुका भडगाव यांच्या मालकीचे श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स हे दुकान कोळगाव तालुका भडगाव येथे असून अज्ञात चोरट्यांनी 30 जानेवारी रात्री 8 ते 31 जानेवारी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान दुकानाचे शटर चे कान तोडून आत प्रवेश करीत ड्राव्हर मध्ये ठेवलेली एक किलो वजनाची मोड तोडची चांदी चोरून नेली. याबाबत नितीन डहाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्य विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास निलेश ब्राह्मणकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.