महाराष्ट्राच्या औद्योगिक-व्यापार विकासातील महाराष्ट्र चेंबरचे योगदान गौरवास्पद: उपराष्ट्रपती जगदीश धनकड

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिल्ली येथे घेतली उपराष्ट्रपतींची भेट

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

उपराष्ट्रपती महामहीम जगदीशजी धनकड (Jagdish Dhankad) यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नवी दिल्ली (New Delhi) येथे संसदेतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. महाराष्ट्राच्या औद्योगिक व्यापार विकासातील महाराष्ट्र चेंबरचे योगदान गौरवास्पद असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपदी जगदीश धनकड यांनी काढले. त्यासह महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय- नाशिकच्या सुवर्णमहोत्सव सांगता समारंभासाठी त्यांना दिलेले आमंत्रण त्यांनी स्वीकारले. या वेळी हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, महाराष्ट्र चेंबरचे युवा उद्योजक समितीचे चेअरमन संदीप भंडारी उपस्थित होते. चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी महाराष्ट्र चेंबरतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

अध्यक्ष ललित गांधी (Lalit Gandhi) म्हणाले, चेंबरचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांचे भारतीय उद्योग जगतातील अफाट योगदान आहे. देशाच्या जडणघडणीत उद्योजकांचा मोठा वाटा आहे. उद्योजक, व्यापारी आणि सरकारमधील महत्वाचा दुवा म्हणून महाराष्ट्र चेंबर कार्यरत आहे. महाराष्ट्राच्या उद्योग, व्यापाराच्या जडणघडणीत चेंबरचा मोठा वाटा आहे. उद्योजक, व्यापारी यांचे हक्कांचे व्यासपीठ चेंबर असून त्या माध्यमातून राज्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात उत्तर महाराष्ट्र शाखेच्या नवीन कार्यालयाची उभारणी केली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्र शाखा माइलस्टोन आहे.

उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) व्यापार उद्योगाच्या विकासासाठी उत्तर महाराष्ट्र शाखेने महत्त्वाचे कार्य केलेले असून व्यापार उद्योगाच्या विकासासाठी व्यापारी उद्योजकांच्या विविध संघटना स्थापन केल्या आहेत. दरम्यान अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या सुवर्णमहोत्सव सांगता समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले. त्यांनी महाराष्ट्र चेंबरचे आमंत्रण स्विकारुन उपस्थित राहण्याची ग्वाही अध्यक्ष गांधी यांना दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.