एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई – अजित पवार

0

मुंबई ;- ठाणे येथील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्याची चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

ठाणे येथील जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पाण्यात डोके बुडवून पाठीवर दांडक्याचे बेदम प्रहार करण्याची घटना उघडकीस आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. विद्यार्थ्यांना झालेली मारहाण अत्यंत गंभीर आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅगिंग प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करण्याची मागणी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. या निर्दयी घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.