एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्याची ओळख पटली ; गुन्हा दाखल

0

 

मुंबई ;- ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला. विद्यार्थ्यांना ओणवे उभे करून त्यांना साचलेल्या पाण्यात डोके बुडवून उभे राहण्याची अघोरी शिक्षा देण्यात आली.ओळख पटलीअसून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम प्रजापती वय २० असे या सिनियर विद्यार्थ्यांचे नाव आहे . हा प्रश्न आज विधानसभेत विचारला गेला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले.

या व्हायरल व्हिडिओत सीनिअर विद्यार्थ्याकडून दांडक्याने बेदम मारहाणही करण्यात आली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली.
एनसीसी विद्यार्थ्यांना मारहाण करणारा विद्यार्थी भांडूप येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. ठाण्यातील महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तो येत होता. 26 जुलै रोजी कारगिल दिनानिमित्त एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग सुरू होते. यादरम्यान काही विद्यार्थ्यांची सॅल्यूट करताना चूक झाली. यामुळे संतापलेल्या सीनियरने एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. याचा व्हिडीओ एकाने महाविद्यालयाच्या लायब्ररितून चित्रित केला.

सॅल्यूट व्यवस्थित न केल्याने विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यात ओणवे उभे करण्यात आले आणि त्यांना पाण्यात तोंड बुडवून उभे राहण्याची शिक्षा देण्यात आली. एखाद्या विद्यार्थ्याने पाण्यातून तोंड बाहेर काढले तर त्यांच्यावर पाठीमागून त्यांचे सीनिअर लाकडी दांड्याने मारहाण करत होते. 3 ऑगस्ट रोजी हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 20 वर्षीय शुभम प्रजापती या सीनियर एनसीसी कॅडेटविरुद्ध कलम 323 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला निलंबितही करण्यात आले आहे.
मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही ज्युनिअर विद्यार्थ्यांनी प्रजापतीविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचे जबाबात म्हटले. त्यामुळे व्हायरल व्हिडीओच्या आधारे आम्ही स्वत:हून कारवाई केल्याचे डीसीपी गणेश गावडे म्हणाले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.