Wifi चा पासवर्ड न दिल्याने तरुणाचा निर्घृण खून

0

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नवी मुंबईतून (Navi Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आलीय. कामोठे (Kamothe) येथील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणांना 17 वर्षीय तरुणाने इंटरनेट वाय-फायचा (Wifi) पासवर्ड (Passward) शेअर करण्यास नकार दिल्याने त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

कामोठे सेक्टर 14 येथील भर रस्त्यात हा प्रकार घडला आहे. आरोपी रवींद्र अटवाल आणि राज वाल्मिकी हे दोघेही सफाई कामगार म्हणून काम करत असून मृत विशाल मौर्य हा बेकरी मध्ये काम करतो.

विशाल मोर्यने आपला इंटरनेट पासवर्ड देण्यास नकार दिल्याच्या रागातून रवींद्र आणि राज यांनी विशालला रस्त्यात गाठत त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात विशालचा मृत्यू झाला असून कामोठे पोलिसांनी दोघं आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.