राष्ट्रवादीच्या कॅलेंडरची जोरदार चर्चा, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादीच्या कॅलेंडरची जोरदार चर्चा आहे. या कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर हिरवा चांद आणि बोकडाची प्रतिमा दिसत आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपने हे फोटो शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीच्या कॅलेंडरवर विठुरायाच्या फोटोवर हिरवा चांद आणि बोकड दाखवून राष्ट्रवादीला काय दाखवायचं आहे? असा संतप्त सवाल भाजपने ट्विट करत उपिस्थत केला आहे. तसेच जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. विठूरायाची हि विटंबना महाराष्ट्रात सहन केली जाणार नाही. असा इशाराही भाजपने दिला आहे. सध्या तरी भाजपच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या माध्यमातून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शरद पवार (Sharad Pawar) काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख दुनेश्‍वर पेठे
एकाच दिवशी दोन सण आल्याने वार्षिक कॅलेंडरमध्ये प्रिटिंगदरम्यान अनवधानाने चूक झाली आहे. यात कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. यावरून वारकरी, भक्तांच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. हा निश्चितच गंभीर विषय असल्याने सणासुदीच्या दिवसात कुणीही यावर राजकारण करू नये, असे आवाहन करत शहराध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.